Photos
Videos
बाबा
828
73
Respect Her
511
120
Damlelya Babachi Kahani दमलेल्या बाबाची कहाणी | Official Trailer
492
11
Posts

देशातील पहिल्या महिला वकिल : गुगलने डूडलच्या माध्यमातून केला सलाम - वाचा http://nashikonweb.com/googles-doodle-honours-cornelia-sor…/

Share this on WhatsAppमुळ नाशिकच्या असललेल्या आणि देवळाली येथे जन्मलेल्या महिला या आपल्या देशातील पहिल्या महिला आहेत ज्यांनी वकील म्हणून भारतात आणि ब्रिटन येथे
nashikonweb.com

“सर्वांना गणेशचतुर्थीच्या हार्दीक शुभेच्छा.
तुमच्या मनातील सर्व मनोकामना पूर्ण होवोत , सर्वांना
सुख, समृध्दी, ऎश्वर्य,शांती,आरोग्य लाभो हीच
बाप्पाच्या चरणी प्रार्थना. “
गणपती बाप्पा मोरया , मंगलमुर्ती मोरया !!!...
सुपरहिट पार्वतीच्या बाळा गाणं.. शेर करा
https://www.youtube.com/watch?v=gBPHRLb7VQ4

See More
Presenting Parvatichya bala ganpati song. Enjoy NonStop Ganpati Songs Marathi (गणपतीची गाणी) - a collection of superhit ganpati marathi songs this Ganesh Cha...
youtube.com
Posts

पूर्वी वडिलांच्या अंगावरील जुने कपडे पाहून,
मी त्यांना कित्येकदा "ओरडलो" असेल कि,
नवीन कपडे शिवून घ्या,
फाटेपर्यंत घालायचे असतात का ?
पण ते "हो" म्हणून वेळ मारून नेत असतं......
तसा दिवाळीचा आणि आपला काही संबंध नाही
पण, "स्त्रीहट्ट" आणि "बालहट्ट" सांभाळून घेताना,
कोणाला कपडे, कोणाला मोबाईल...
वगैरे वगैरे अशी खूप मोठी प्लांनिग केली,
अचानक लक्षात आले "स्वत:साठी" काहीच ठरवले नाही....
तोच समोर "वडिलांचा चेहरा" समोर आला,
वडील तेव्हा का जुने कपडे घालत असतं,
ते कळून चुकले, मात्र...
मी स्वत "वडील" झाल्यावर....
कपड्याने दरिद्री दिसणारे वडील...
पैश्याने मोजता येणार नाही असे
"धनवान" असतात...
कुटुंबाच्या सुखातच स्वतचे सुख शोधतात...
आदर असतोच, पण....
आणखीच वाढला... अन...
न कळत डोळ्याची किनार पाणावली....
बापाची चप्पल आपल्या पायात आली कि,
आपण कधी वडिलांना लक्षात घेतंच नाही...
कित्येकदा उद्धटासारखेहि वागतो...
पण आपण "लक्षात न घेतलेला बाप"...
लक्षात येतो...
मात्र आपण स्वत बाप झाल्यावरच...

See More
Image may contain: one or more people

कोमेजून निजलेली एक परीराणी
उतरलेले तोंड, डोळा सुकलेले पाणी
रोजचेच आहे सारे काही आज नाही
माफी कशी मागू पोरी मला तोंड नाही
झोपेतच घेतो तुला आज मी कुशीत...
निजेतच तरी पण येशील खुशीत
सांगायाची आहे माझ्या सानुल्या फुला
दमलेल्या बाबाची ही कहाणी तुला!

आटपाट नगरात गर्दी होती भारी
घामाघूम राजा करी लोकलची वारी
रोज सकाळीस राजा निघताना बोले
गोष्ट सांगायचे काल राहुनिया गेले
जमलेच नाही काल येणे मला जरी
आज परी येणार मी वेळेतच घरी
स्वप्नातल्या गावामध्ये मारू मग फेरी
खऱ्याखुऱ्या परी साठी गोष्टीतली परी
बांधीन मी थकलेल्या हातांचा झुला
दमलेल्या बाबाची ही कहाणी तुला!

ऑफिसात उशिरा मी असतो बसून
भंडावले डोके गेले कामात बुडून
तास-तास जातो खाल मानेने निघून
एक-एक दिवा जातो हळूच विझून
अशा वेळी काय सांगू काय काय वाटे
आठवांसोबत पाणी डोळ्यांतून दाटे
वाटते की उठुनिया तुझ्या पास यावे
तुझ्यासाठी मीही पुन्हा लहानगे व्हावे
उगाचच रुसावे नी भांडावे तुझ्याशी
चिमुकले खेळ काही मांडावे तुझ्याशी

उधळत, खिदळत, बोलशील काही
बघताना भान मला उरणार नाही
हासुनिया उगाचच ओरडेल काही
दुरूनच आपल्याला बघणारी आई
तरी सुद्धा दोघे जण दंगा मांडू असा
क्षणा क्षणावर ठेवू खोडकर ठसा
सांगायची आहे माझ्या सानुल्या फुला
दमलेल्या बाबाची ही कहाणी तुला!

दमल्या पायाने जेव्हा येईल जांभई
मऊ मऊ दूध-भात भरवेल आई
गोष्ट ऐकायला मग येशील ना अशी
सावरीच्या उशीहून मऊ माझी कुशी

कुशी माझी सांगत आहे ऐक बाळा काही
सदोदित जरी का मी तुझ्या पास नाही
जेवू-खाऊ न्हाऊ-माखू घालतो ना तुला
आई परी वेणीफणी करतो ना तुला
तुझ्यासाठी आईपरी बाबा सुद्धा खुळा
तो ही कधी गुपचूप रडतो रे बाळा
सांगायची आहे माझ्या सानुल्या फुला
दमलेल्या बाबाची या कहाणी तुला!

बोळक्यामध्ये लुकलुकलेला तुझा पहिला दात
आणि पहिल्यांदाच घेतलास जेव्हा तोंडी मऊ भात
आई म्हणण्याआधी सुद्धा म्हणली होतीस बाबा
रांगत रांगत घेतलास जेव्हा घराचा तू ताबा
लुटूलुटू उभं राहत टाकलंस पाऊल पहिलं
दूरचं पहात राहिलो फक्त, जवळ पहायचंच राहिलं

असा गेलो आहे बाळा पुरा अडकून
हल्ली तुला झोपेतच पाहतो दुरून
असा कसा बाबा देव लेकराला देतो
लवकर जातो आणि उशिरानं येतो
बालपण गेले तुझे गुज निसटून
उरे काय तुझ्या-माझ्या ओंजळी मधून
जरी येते ओठी तुझ्या माझ्यासाठी हसे
नजरेत तुझ्या काही अनोळखी दिसे
तुझ्या जगातून बाबा हरवेल का ग?
मोठेपणी बाबा तुला आठवेल का ग?
सासुराला जाता-जाता उंबरठ्यामध्ये
बाबासाठी येईल का पाणी डोळ्यांमध्ये7?

Play song here
http://kavikatta.com/songs.php

See More
Image may contain: 1 person, sitting

आपले चिमुकले हाथधरून जे
आपल्याला चालायला शिकवतात...
ते बाबा असतात
आपण काही चांगले केल्यावर .
जे अभिमानाने सगळ्याना सांगतात... ....
ते बाबा असतात.
माझ्या लेकराला काही कमी
पडू नए या साठी जे घाम गाळतात....
.....ते बाबा असतात.
आयुष्याच्या रस्त्यावर चालताना
जे आपल्याला चुकताना सावरतात..
ते बाबा असतात.
आपल्या लेकराच्या सुखा
साठी जे आपला देह ही
अर्पण करतात..... ....ते बाबा असतात
#Kavikatta

See More
Image may contain: one or more people
आजही अडगळीतली खेळणी तिची ,
छातीसी धरुण रडतो ;
नाही मिळत ऊत्तर माझ्या चिऊच्या प्रश्नाचं ,
का बाप कन्यादान करतो .....
का कन्यादान करतो......?
kavikatta.com
नाशिक शहरातील एका धनाढ्या बिल्डरच्या डोममध्ये एक विवाह सोहळा पार पडला. बर सोशल मिडिया होता म्हणून की काय तो सोहळा बाहेर पडला. या सोहळ्यासाठी
nashikonweb.com

कॉमेडी ची बुलेट ट्रेन सुपरस्टार नम्रता संभेराव आता येतेय एक नवीन शो घेऊन "कॉमेडी मिसळ तर्री मारून" बघा फक्त आमच्या मराठी गौरव या YOUTUBE चॅनेल वर -
https://www.youtube.com/watch?v=6sTotnpeCc0

Enjoy Latest Marathi Comedy Show - कॉमेडीची मिसळ Tarrrrri Marun Part 1 bought to you by Fountain Music Company. Enjoy Non-Stop comedy marathi jokes and de st...
youtube.com
It looks like you may be having problems playing this video. If so, please try restarting your browser.
Close
3,595 Views
" Aayushyavar Bolu Kahi " " आयुष्यावर बोलू काही "

सुखकर्ता दुखहर्ता वार्ता विघ्नाची Aarti ! Beautiful video recreated by Fountain Music Company. Like and Share. Also Download 100 Ganpati Songs/Video on your And...roid Phone free. App Download Link :

See More

बाप हा बाप्पाच असतो
फोटो : मयूर बारगजे
Mayur Bargaje
#GodavariFloods #Nashik

Image may contain: 2 people, people standing, child, outdoor and water
" Aayushyavar Bolu Kahi " " आयुष्यावर बोलू काही "

सुखांचे सॅशे!

आपण किराणामालाच्या दुकानात उभे असतो, मुलानी कुठलीशी दुधात घालायची पावडर आणि बायकोनी कुठलासा लै भारीवाला शांपू आणायला सांगितलेला असतो… या दोन्हीच...्या च्या रेग्युलर पॅक्स वरच्या किंमती बघून आपले डोळे पांढरे व्हायची वेळ आलेली असते… आपण ते घ्यावेत का नाही या द्विधा मनःस्थितीत असताना दुकानदार हळूच सांगतो, ‘दोन्हीचे सॅचे आहेत साहेब… try करून बघा…’ मग आपण ते ‘सॅचे’ किंवा सॅशे बघतो… अगदीच पाच-दहा रुपयांना असतात… खुष होऊन आपण दोन्हीचे दोन-चार सॅशे घेऊन टाकतो आणि ताठ मानेनं घरी परत जातो!!

'सॅशे' हे भारतीय बाजारपेठेसाठी बहुराष्ट्रीय कंपन्यांनी केलेलं सगळ्यांत मोठं इनोव्हेशन आहे! हल्ली शांपू पासून सॉसेस पर्यंत, साबणांपासून मसाल्यांपर्यंत, गोळ्या-बिस्किटांपासून ते नारळपाण्याच्या पावडरी पर्यंत कशाकशाचेही सॅशे मिळतात… गिऱ्हाईकाला एकदम एक मोठ्ठा पॅक शे-दोनशे-चारशे रुपयांना घ्यायला लावायच्या ऐवजी दोन-पाच-दहा रुपयांचे ‘छोटे पॅक्स’ देणं हे त्या गिऱ्हाईकाच्या आणि आपल्याही फायद्याचं आहे हे आजकाल सगळ्याच कंपन्या जाणतात आणि तसं वागतातही…! आपणही खूप पैसे देऊन मोठ्ठे पुडे विकत घ्यायच्या ऐवजी कमी पैसे देऊन छोटे पॅक्स आणि सॅशेज विकत घेतो…

पण किराणामालाच्या दुकानातल्या व्यवहारांत दाखवत असलेला हा समजुतदारपणा आपण आपल्या व्यक्तिगत आयुष्यात मात्र अमलात आणत नाही!!

आपण आपल्या आयुष्यात सुखांच्या मोठ्या मोठ्या पॅकेट्सच्या मागे अहोरात्र धावत असतो…. मोठ्ठं घर… मोठ्ठी गाडी… भरपूर बॅंक बॅलन्स… अफाट प्रसिद्धी… प्रचंड यश… वगैरे वगैरे वगैरे…. सुखांचे हे भले मोठ्ठे पॅक्स मिळावेत म्हणून आपण जीवापाड मेहनत करत रहातो… हे मोठे पॅक मिळाले / मिळवले तरच आनंदी होतो… नाही मिळाले तर किंवा मिळत नाहीत तोवर दु:खी रहातो…

पण सुखं ही फक्त मोठ्या पॅक्समध्ये मिळत नाहीत तर छोट्याश्या सॅशे मध्येही मिळू शकतात हे आपण लक्षातच घेत नाही!!

म्हणजे,
"मोठ्ठं घर” होईल तेंव्हा होईल, पण सध्याच्या छोट्या घरात निवांत जगत सुखानं शांत झोप लागू शकणं हा किती छान सुखाचा सॅशे असतो...

"मोठ्ठी गाडी” घेऊ तेंव्हा घेऊ, पण सध्याच्या छोट्या गाडीतून वाऱ्यावर स्वार होऊन गावभर बेभान भटकणं हाही एक सुखाचा सॅशे असतो…

हेच सारं प्रसिद्धी, यश वगैरे साऱ्या साऱ्या मोठ्या पॅकेजेसचं… या सगळ्या मोठय़ा पॅकेजेसचे कोणते ना कोणते छोटे सॅशे असतात… जे आपण ओळखून अनुभवले ते मोठ्या पॅक्सहून जास्त सुखाचा अनुभव आपल्याला येऊ शकतो…

रहाता रहाते गोष्ट ती "भरपूर बॅंक बॅलन्स” किंवा खिशातल्या अफाट पैशाची… पैसा हे एक असं पॅकेज आहे की ज्याच्या सॅशेमध्ये मजा नाही असं आपल्याला वाटतं… हजारच्या नोटेची किंमत शंभरच्या नोटेला नाही आणि शंभरच्या नोटेची ऊब पाच रुपयाच्या नाण्याला नाही…

खरंच असं वाटतं तुम्हाला?

तर मग, धो धो पाऊस कोसळत असताना, टपरीवरचा वाफाळता चहा आणि गरम्म भजी हवी घेण्यासाठी हजारची नोट देऊन बघा किंवा लाखो रुपये बॅलन्स असलेलं तुमचं क्रेडिट कार्ड देऊन बघा…!!

नाही मिळणार ते सुख तुम्हाला हजारो लाखो रुपयांनी…

तिथे पाच रुपयांच्या कॉईन्सचे दोन-चार सॅशेच पुरेसे असतील!!
पोस्टचे मूळ लेखक : प्रसाद शिरगावकर

See More