Photos
Posts
Image may contain: 1 person, standing, sky, tree and outdoor
Santosh Karkhanis

गेले दहा दिवस गोराई, मुंबई येथील विपश्यना केंद्रात दहा दिवसांच्या विपश्यना शिबिरास गेलो होतो. दहा दिवसांचे हे माझे सातवे शिबीर (शिवाय आठ दिवसांचे एक केले आहे). ...या दहा दिवसात मनावर चढलेला सर्व मळ धुवून निघाला. आता एकदम ताजेतवाने वाटत आहे.
विपश्यना ही ध्यानाची एक पुरातन विद्या. भारतात अनेक वेळा ही विद्या जागली, पण काही काल त्याचा लाभ झाल्यावर त्यात काही संमिश्रणे झाल्यावर त्या विद्येने आपली शक्ती गमावली आणि लाभ न झाल्याने तिचा अभ्यासही बंद झाला. असे वारंवार घडले आहे. भगवान गौतम बुद्धाने अथक परिश्रमाने ही विद्या परत शोधून काढली. पण त्यांच्यानंतर पाचशे वर्षातच तिचा परत लोप झाला. मात्र दक्षिण म्यानमारमध्ये एका छोट्या समूहाने गुरु-शिष्य परंपरेने ही विद्या जिवंत ठेवली. म्यानमारमधील हिंदू आणि भारतीय समूहाचे एक नेते गोएंकागुरुजी योगायोगाने या विद्येच्या संपर्कात आले. त्यांनी या विद्येच्या प्रसारासाठी आपले उर्वरित आयुष्य वेचले. आज जगभर विपश्यना विद्या शिकविणारी केंद्रे आहेत. इगतपुरी येथे मुख्य केंद्र आहे.
मनातील विकार (लोभ-द्वेष इत्यादी) काढून टाकण्याचा उपदेश सर्व धर्म करतात. गीतेतही 'स्थितप्रज्ञता' या विषयावर भर आहे. पण हे विकार कसे काढायचे याचे स्पष्ट मार्गदर्शन नाही. या विपश्यना शिबिरांत आपण हे मन विकारमुक्त करण्याचे तंत्र शिकतो. शरीरावरील संवेदनांच्या सहाय्याने अंतर्मनापर्यंत पोचणे आणि अंतर्मनात खोलवर दडलेले विकार बाहेर काढणे ही ती गुरुकिल्ली. मनातील विकार कमी होऊ लागल्यावर लगेचच मन शांत होऊ लागते. या दहा दिवसांच्या शिबीरकाळातच त्याचा प्रत्यय येऊ लागतो. मग शिबिरात शिकलेल्या विद्येच्या सहाय्याने आपण नंतरही हे काम घरी चालू ठेऊ शकतो.
ही शिबिरात शिकविली जाणारी विद्या जरी भगवान गौतम बुद्धाने जागविलेली असली तरी येथे कोठल्याही संप्रदायाचा (बौद्ध, हिंदू इत्यादी) प्रसार होत नाही. येथे केवळ शील, समाधी आणि प्रज्ञा या तीन विषयांवरच काम होते. म्हणूनच सर्व धर्मांचे लोक येथे ही विद्या शिकण्यास येतात. माझ्याबरोबर पूर्वीच्या एका शिबिरात स्वत:ला कट्टर मुस्लीम म्हणविणारा एक आला होता. ही विद्या शिकून नमाज पढताना मन एकाग्र होते असे कळल्याने तो आला होता. ही शिबिरे अनेक चर्चमध्येही झाली आहेत. अनेक मुस्लीम देशांतही होतात.
दहा दिवसांचे Basic शिबीर असते. तेथेच राहावे लागते. जेवण आणि राहण्याची व्यवस्था उत्तम असते. या शिबिरासाठी कोठलेही शुल्क नाही. शिबीर संपल्यावर साधक आपल्या इच्छेनुसार गुरुदक्षिणा देऊ शकतात. संपूर्ण शिविराचा खर्च या गुरुदक्षिणेवर चालतो. येथे शिकविणारे शिक्षकही कोठलाही लाभ न घेता शिकवितात.
आपण या शिबिराला कधी गेला नसाल तर अवश्य अनुभव घ्या.
अधिक माहितीसाठी http://www.dhamma.org

See More
Image may contain: indoor and outdoor
Santosh Karkhanis

उद्या बुद्ध पौर्णिमा. वैशाख पौर्णिमेला गौतमाचा जन्म झाला, याच दिवशी त्याला ज्ञानप्राप्ती झाली आणि वैशाख पौर्णिमेलाच गौतम बुद्धाने या जगाचा निरोप घेतला. म्हणूनच ...या दिवसाचे खूप महत्व आहे.
माझी अध्यात्मशास्त्रात भटकंती चालू असताना मला योग्य दिशा गोएंका गुरुजींच्या विपस्सना शिबिरातून मिळाली. तथागतापासून गोएंकागुरुजीपर्यंत सर्व गुरु, ज्यांनी ही विद्या माझ्यापर्यंत आणून पोचविली त्यांच्याप्रति मी कृतज्ञता व्यक्त करतो.

See More
Posts

विपस्सना : गोएंका गुरुजींची या दहा दिवसात होणारी प्रवचने.
https://www.youtube.com/watch…

Vipassana Meditation Discourse - Day 1 (Hindi)
youtube.com
Pune : How To Do Vipassana Meditation Story
youtube.com

अप्प दीपो भव !
विपस्सना शिबिरातून (इगतपुरी) नुकताच परतत आहे.
दहा दिवसांचे हे माझे सहावे शिबीर
(आणि एक आठ दिवसाचे सतिपट्टान शिबीर झाले आहे.)
दहा दिवसात मनाची चांगली धुलाई झाली. ...
मोकळे मोकळे वाटत आहे.
बुद्धं स्सरणं गच्छामि |
धम्मं स्सरणं गच्छामि |
संघं स्सरणं गच्छामि |

See More
No automatic alt text available.
Image may contain: 2 people
Image may contain: 2 people

लेखिका : सुषमा जाधव

विपश्यनेचे इगतपुरीतील १० दिवस .....अविस्मरणीय अनुभव .

पहिला दिवस....आत प्रवेश करताच हातातील मोबाईल काढून घेतला गेला. आणि जगाशी संपर्काच तुटला. मुलांशीही बोलू शकणार नाही आता हि जाणीव होताच एका आईचे हृदय थोडे कळवळू लागले. आणि कितीही कळवळलो तरी इथून १० दिवस सुटका नाही हे समजल्याने पहिला विचार भक्कम पणे मनातून काढून टाकला गेला. एक तर जबरदस्तीने आणले गेलेले. मनाविरुद्धच. नवऱ्यावर रागही येत होता. कामधाम टाकून , मुलांच्या परीक्षेची फिकीर न करता इथे मौनात राहायला...

Continue Reading

Just completed reading of series of 9 books on 'Ashtavakra Geeta' (in Hindi) by Osho. Great Book...Every one practicing meditation must read it.

Just Returning from 10 days Vipassana course from Dhammagiri, Igatpuri (My 5th course).